त्या कार्यक्रमाला गेलो नाही याचे समाधान वाटते!
मुंबई : खरा पंचनामा
आज संसदेत पार पडलेले कार्यक्रम पाहून मी तेथे गेलो नाही याचं आणखी समाधान वाटतंय अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
पवार म्हणाले की, सकाळी मी हा कार्यक्रम पाहिला. तो पाहिल्याच्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो नाही याचं आणखी मला समाधान वाटतंय. त्याचं कारण ज्या लोकांची तिथं उपस्थिती होती आणि जे काही कर्मकांड सुरू होतं ते पाहिल्यानंतर अधुनिक भारताची संकल्पना - जी जवाहारलाल नेहरूनी मांडली, ती आणि सध्या संसदेत जे सुरू आहे त्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही.
पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटत आहे.
विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूनी आधुनिक विज्ञानावर आधारित समाज तयार करण्याची भूमिका सतत्याने मांडली. आज जे संसदेत चाललंय ते याच्या नेमकं उलट सुरू आहे असे शरद पवार म्हणाले.
पवार म्हणाले की, संसदेच्या कुठल्याही कामाची सुरूवात राष्ट्रपतींच्या उपस्थिती किंवा त्यांच्या भाषणातून होत असते. उद्या आधिवेशन सुरू झालं तर त्याची सुरूवात राष्ट्रपतींच्या भाषणाने होते.
राज्यसभेचा मी सभासद आहे. राज्यसभेचे प्रमुख हे उपराष्ट्रपती आहेत. या कार्यक्रमात लोकसभेचे स्पीकर दिसले आनंद आहे, पण राज्यसभेचे स्पीकर जे उपराष्ट्रपती आहेत त्यांची उपस्थिती कार्यक्रमात दिसली नाही. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम फक्त मर्यादित घटकांपुरताच होता का अशी शंका वाटते असे शरद पवार म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
