सुप्रिया सुळे यांचे एक भाकीत खरे ठरले, दुसरेही ठरणार?
मुंबई : खरा पंचनामा
शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी एक भाकीत केले होते. ते भाकीत खरे ठरले! शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. त्यामुळे आता सुळे यांचे दुसरे भाकीत काय असेल, याची चर्चा सुरु झाली आहे.
मुंबईतील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शरद पवार यांनी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. हा निर्णय मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे आग्रह करीत आहेत. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेकांना अश्रु अनावर झाले होते.
शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी नुकतेच दोन राजकीय भूकंपाचे संकेत दिले होते. सुळे म्हणाल्या की, 'दोन राजकीय भूकंप येतील', एक नवी दिल्लीत आणि दुसरा महाराष्ट्रात. आता सुळे यांचे एक भाकीत खरे ठरल्याचे मानले जात आहे जे महाराष्ट्रात घडले. आता दुसरा भूकंप कधी होणार याची चर्चा सुरु झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
