Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सुप्रियाताई, अजितदादा, जयंतराव, पटेल की भुजबळ : धुरा कोणाकडे?

सुप्रियाताई, अजितदादा, जयंतराव, पटेल की भुजबळ : धुरा कोणाकडे? 



मुंबई : खरा पंचनामा 

शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज पार पडला. याच कार्यक्रमामध्ये पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. पवारांच्या या घोषणेनंतर कार्यक्रमाचा सगळा नूरच पालटला. 

पवार यांच्या या घोषणेनंतर नेते, कार्यकर्ते भावुक झाले होते. कार्यकर्त्यांचा आवेग पाहून स्वतः पवार आणि प्रतिभाताई यादेखील भावुक झाल्या होत्या. वाय. बी. सेंटरमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये पवार तब्बल दोन ते अडीच तास बसून होते. प्रत्येक जण आपापले म्हणणे मांडत होता. पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून दोन दिवसांत तुमच्या भावनांचा विचार करून निर्णय घेऊ, अशी भूमिका मांडली. 

शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वीच (२७ एप्रिल) 'भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे. ती वेळीच फिरविली नाही तर करपते,' असे वक्तव्य केले होते. या सर्वांचा विचार करता अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे द्यायची याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यापैकी एकाकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाईल असा अंदाज बांधला जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील नवा अध्यक्ष नेमण्यापासून इतर महत्त्वाच्या निर्णयांसाठी विशेष समिती स्थापन केल्याचेही पवार यांनी भाषणात जाहीर केले. या समितीत माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, राजेश टोपे, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, फौजिया खान, जितेंद्र आव्हाड, जयदेव गायकवाड, धीरज शर्मा यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.