Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

समिती तुमच्या मनातीलच निर्णय घेईल : अजित पवार

समिती तुमच्या मनातीलच निर्णय घेईल : अजित पवारमुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच भावुक झाले. त्यावेळी अजित पवार म्हणाले, 'समिती ठरवेल ते शरद पवार यांना मान्य असेल.' शिवाय त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती देखील केली. एवढंच नाही तर, शरद पवार यांनी घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते भावुक झाले. परिवारातील सदस्य असतील. मी असेल सुप्रिया सुळे असतील. तुम्ही भावनिक साद जी साहेबांना घातली, ती आमच्या लक्षात आली आहे. पण तुम्ही काही अडचण लक्षात घ्या. समिती तुमच्या मनातील योग्य निर्णय घेईल एवढीच खात्री मी तुम्हाला या निमित्ताने देतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, सगळ्यांच्या भावना साहेबांनी ऐकल्या. पवार साहेब अध्यक्ष म्हणजे पक्षात नाही, असा गैरसमज तुम्ही करुन घेत आहेत. परंतु आज काँग्रेसचे अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन खरगे, पक्ष चालला आहे सोनियाजींच्या नावावर. पवार साहेबांचा वयाचा विचार करता नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल.

साहेब अध्यक्ष असो किंवा नसो, असाच परिवार जात राहील. साहेब आहेतच ना, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणार आहे. साहेबांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे. साहेबांचा निर्णय एक धक्का आहे. पण साहेब आपल्या निर्णयावर ठाम आहेत. साहेबांच्या मार्गदर्शनखाली पक्ष चालणार आहे. साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको? या शब्दांत चार खडे बोल कार्यकर्त्यांनी सुनावले. नवीन येणारा अध्यक्ष साहेबांशी चर्चा करुन निर्णय घेईल. साहेब काल निर्णय जाहीर करणार होते. परंतु काल महाविकास आघाडीची सभा होती. त्यामुळे हा निर्णय आज जाहीर केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.