Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सोन्या-चांदीच्या विटा लंपास

फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सोन्या-चांदीच्या विटा लंपास



सातारा : खरा पंचनामा

सातारा जिल्ह्यातील बोरगाव येथे कुरिअर घेऊन जाणाऱ्या पीकअप गाडीचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गाडीतील 7 किलो वजनाच्या सोन्या-चांदीच्या विटा लंपास करण्यात आल्या. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप गाडीच्या पाठलागाचा थरार फिल्मी स्टाईलने सुरु होता. पीकअप गाडीतील चालकाला त्याची कल्पना आली नाही. मध्यरात्री 2 ते 3 वाजता गाडी बोरगावजवळ आली. त्यावेळी चोरट्यांनी गाडीला अडवत, धमकवत गाडीत असणाऱ्या 7 किलो वजनाच्या सोने आणि चांदीच्या विटा लंपास केल्या.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर लगेच लुटारूच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले. लुटारूचा पाठलाग करत असताना पोलिसांना पीकअप गाडी सापडली. मात्र सोने-चांदी घेऊन चोर इनोव्हा कार आणि दुचाकीवरून पसार झाल्याचे सांगण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.