Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

50 हजारांची लाच घेताना महिला पोलिस उपनिरीक्षकास अटक

50 हजारांची लाच घेताना महिला पोलिस उपनिरीक्षकास अटकठाणे : खरा पंचनामा

गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 50 हजाराची लाच घेणाऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. महिला अधिकाऱ्याविरूध्द उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सिंधु तुकाराम मुंडे असे लाच घेणाऱ्या महिला उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या वडिलांविरूध्द उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्या तपासात मदत करण्यासाठी सिंधु मुंडे  यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरूवातीला 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 50 हजार रूपयाचे घेण्याचे ठरले.

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करण्यात आली. बुधवारी सिंधु मुंडे यांनी ती लाच स्वीकारली. त्यांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.