समाज विघातक लोकांना पाठीशी घालू नका : डॉ. तेली
सांगली : खरा पंचनामा
सोशल मिडीयावर धार्मीक तेढ निर्माण करणारे पोस्ट, संदेश यावर पोलीस प्रशासनाचे लक्ष असुन अशा काही धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट ठेवल्यास त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व समाजातील लोकांनी एकत्र यावे. समाज विघातक लोकांना पाठीशी घालू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले.
कायदा व सुव्यवस्था व जातीय सलोखा रहावा, अवैध व्यवसाय तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. डॉ. तेली म्हणाले, शहरातील वाहतूकीचा आढावा घेवून वाहतूक सुरळीत होणेकरीता योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे जिल्हयातील अवैध व्यवसाय तसेच नशेखोर तरुणांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. पोलीस प्रशासनाकडून योग्य तो पेट्रोलिंग, पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे असे सांगितले.
यावेळी शिवसेनेचे नेते शंभोराज काटकर, शहाजी भोसले, छाया सर्वदे, संजय पाटील, उत्तम कांबळे, मुजीर जांभळेकर, अशोक पवार, डॉ. ध्यानचंद्र पाटील, प्रा. तांबोळी, इंद्रजीत जोग यांनी अडअडचणी सांगून मनोगत व्यक्त केले.
यावेळी सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, ग्रामीणचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे, संजयनगरचे सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्यासह शांतता कमिटी, महिला दक्षता कमिटी, आजी-माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, व्यापारी, गणेश मार्केट, कापडपेठ, गणपती पेठ, मार्केट यार्ड येथील व्यापारी उद्योजक, सराफ व्यवसायीक, हॉटेल व्यवसायीक, दलित संघटनेचे प्रमुख उपस्थित होते. सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी आभार मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.