Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरात राडा : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह 8 जणांवर गुन्हा!

कोल्हापुरात राडा : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह 8 जणांवर गुन्हा!मुंबई : खरा पंचनामा

मनसे नेते संदीप देशपांडे आणि इतर 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात कोल्हापूरातील राडा राजकारण्यांना भोवणार अशी चर्चा सुरु आहे. संदीप देशपांडे आणि इतर 8 जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37, 135 अन्वये कोल्हापुरात झालेल्या निदर्शनानंतर औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोल्हापूर आणि अहमदनगर येथे औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून मोठा वाद उफाळला. या संपूर्ण प्रकाराचा निषेधार्थ दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने बुधवारी आंदोलन केले. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क येथे औरंगजेबाचा पुतळा जाळला.

औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. शहराच्या अनेक भागांत दगडफेक, तोडफोडीने दंगल उसळली होती. त्यात दोनशेवर वाहने, दुकाने, टपऱ्या, घरांचे नुकसान झाले. पोलिसांनी जमावाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी वारंवार लाठीमार केला होता. शिवाय काही काळासाठी इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.