Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात : एक ठार, तीन गंभीर

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात : एक ठार, तीन गंभीर 



मिरज : खरा पंचनामा

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजेजवळ दोन भरधाव ट्रकची जोरदार धडक झाली. यामध्ये एकजण ठार झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला.

कर्नाटकातील बिदर येथून फरशी आणि ऍसिड घेऊन दोन वेगवेगळे ट्रक नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरकडे निघाले होते. दोन्ही ट्रक मिरजेजवळ आले असता ॲसिड वाहून नेणाऱ्या ट्रकला    फरशी वाहून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.  

पुलाच्या वळणावर फरशी वाहून नेणाऱ्या ट्रकने ॲसिड वाहून नेणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.  यामध्ये ॲसिड भरलेल्या ट्रक चालकाचा मृत्यू झाला. त्या ट्रकमधील क्लिनरसह फरशी नेणाऱ्या ट्रकचा चालक आणि क्लिनर यांच्या डोळ्यात ॲसिड गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.