Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीच्या पथकाला बिहारमध्ये 'मराठी माणसा'चा मदतीचा हात! रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरण

सांगलीच्या पथकाला बिहारमध्ये 'मराठी माणसा'चा मदतीचा हात!
रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरण


अभिजित बसुगडे
सांगली : खरा पंचनामा

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या रिलायन्स ज्वेल्सवरील दरोड्यानंतर सांगलीतील तपास पथके बिहारमध्ये ठाण मांडून आहेत. या गुन्ह्याच्या तपासात बिहार पोलिस सांगली पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे समजते. मात्र आपल्या सांगली पोलिसांच्या पथकाला बिहारमध्ये एका 'बड्या' मराठी माणसाने मदतीचा 'हात' दिला आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील संशयित लवकरच पकडले जातील अशी आशा आहे.

आंध्रची प्यादी आणि महाराष्ट्रातील मोहरा वापरून बिहारच्या वजीराने हा दरोडा टाकल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सांगली पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासात बरीच प्रगती केली आहे. पोलिसांना त्या वजीराच्या राजाचे (राणा) 'प्रताप' खोदून काढले आहेत. आता बिहारमध्ये सांगली पोलिसांचे पथक ते वजीर आणि त्यांचा राजा यांचा कसून शोध घेत आहेत.

दरोडा पडल्यानंतर सांगलीसह कोल्हापूर, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण पोलिसांची अनेक पथके आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार येथे पाठवण्यात आली होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली तपासात प्रगती करत आहेत.

दरोदेखोरांची नावे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांचा तब्बल दहा दिवस बिहारमध्ये शोध घेऊन काही पथके परतली आहेत. तर काही पथके तेथे अजूनही ठाण मांडून आहेत. मात्र बिहार पोलिसांच्या लौकीकाप्रमाणे ते सांगलीच्या पथकांना सहकार्य करत नाहीत. त्यामुळे दरोदेखोरांना पकडण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मात्र अटकेपार झेंडा लावणारा मराठी माणसासाठी बिहार काय चीज आहे? जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेला मराठी माणूस आपल्या माणसाला सहकार्य करतोच. त्याचप्रमाणे बिहारमध्येही सांगलीच्या पथकांच्या मदतीला एक बडा मराठी माणूस धावून आला आहे. त्यामुळे या दरोड्यातील संशयितांना लवकरच अटक होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.