कोल्हापूर, पलूसमध्ये 'ईडी'चे छापे!
सांगली : खरा पंचनामा
कोल्हापूर शहर तसेच सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात ईडीने छापे टाकल्याचे खात्रीपूर्वक वृत्त आहे. या छाप्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोणत्या कारणासाठी हे छापे टाकण्यात आले याची माहिती मिळू शकली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात ईडीने मनी लौन्द्री प्रकरणात यापूर्वीही छापे टाकले आहेत. गुरुवारी सकाळपासून कोल्हापूर आणि पलूस येथे ईडीच्या पथकांनी छापे टाकले आहेत. दरम्यान नेमक्या कोणत्या प्रकरणात हे छापे टाकण्यात आले याची माहिती मिळू शकली नाही. पण आर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दल हे छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोल्हापूर येथील सरकार नावाने प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीच्या घर आणि कार्यालयावर हे छापे टाकण्यात आल्याचे समजते. दरम्यान पलूस तालुक्यात एक बड्या राजकीय नेत्याच्या आडनावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीचे कार्यालय आणि घर अशा दोन्ही ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचेही वृत्त आहे. मात्र या छाप्याबाबत ईडी किंवा अन्य सूत्रांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.