Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तर देवेंद्रजी तुम्हाला शवासन करावे लागेल!

तर देवेंद्रजी तुम्हाला शवासन करावे लागेल!



मुंबई : खरा पंचनामा

देवेंद्रजी एवढ्या खालच्या पातळीवर येऊ नका. परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराबद्दल आम्ही बोललेलो नाही. आम्ही बोललो तर तुम्हाला तर फक्त शवासन कराव लागेल. त्यामुळे परिवाराबद्दल बोलू नका, असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. मुंबई येथे शाखाप्रमुखांच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी १ जुलैच्या मोर्चाबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, देशात सातत्याने जे सर्व्हे झालेत त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आले आहे. भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचं नाव आलं नव्हत. मी नायक की खलनायक हे जनता ठरवेल पण तुम्ही नालायक आहात हे जनतेला माहित आहे. 

मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करा, आम्ही घाबरत नाही पण त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू होता. अशी जेव्हा आणीबाणीची परिस्थिती येते तेव्हा नियमांच्या पलीकडे जाऊन लोकांचे जीव वाचविणे गरजेचे असते ते आम्ही केले. महाराष्ट्रात कोविडच्या काळात प्रेतांची विटंबना झाली नाही. मिळेल तिथे खा ही आमची परंपरा नाही. चौकशी करावयची असेल तर ठाणे, पिंपरी चिंचवड महापालिकेची करा. ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झाला तो आमची काय चौकशी करणार. तुम्ही आमची चौकशी जरूर करा पण आम्हीसुद्धा तुमची चौकशी करणार, असेही ठाकरे म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.