Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्वस्तात सोन्याच्या आमिषाने फसवणूक : आणखी दोघांना अटक

स्वस्तात सोन्याच्या आमिषाने फसवणूक : आणखी दोघांना अटक



सांगली : खरा पंचनामा

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने पुणे येथील व्यापाऱ्याला २५ लाखांना लुटणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात लाख रुपयांची रोकड आणि कार असा ११ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

तुळशीदास सदाशिव नारायणगावकर (वय ४२) आणि साईप्रसाद मोहन पोळ (३१, दोघेही रा. जत्रद वेस, निपाणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पुणे येथील व्यापारी मयूर जैन यांचा मित्र असलेल्या सचिन काळभोर यांच्याशी संपर्क साधत मुख्य सूत्रधार अशोक रेड्डी याने कमी दरात सोने देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर जैन यांना सांगलीत बोलाविण्यात आले होते. यावेळी सोन्यासारखी दिसणारी बिस्किटे दाखवून त्यांच्याकडील २५ लाखांची रोकड लांबविण्यात आली होती. 

सांगलीच्या एलसीबीने तातडीने तपास करीत यातील साडे बारा लाख रुपयांची रोकड आणि चार जणांना आनेवाडी टोलनाक्याजवळ अटक केली होती. यानंतर इतर संशयितांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रवाना झाले होते. त्यानुसार धामणीजवळ दोघांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याजवळ सात लाखांची रोकड मिळून आली. त्यांनी अन्य संशयितांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचीही कबुुली दिली.

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, संदीप नलवडे, आबा धोत्रे, दीपक गायकवाड, कुबेर खोत, सुनीता शेजाळे, बिरोबा नरळे, सागर लवटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.