Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बालासोर रेल्वे अपघात : ज्युनिअर सिग्नल इंजिनिअर कुटुंबासह गायब!

बालासोर रेल्वे अपघात : ज्युनिअर सिग्नल इंजिनिअर कुटुंबासह गायब!



बालासोर : खरा पंचनामा

ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातला वेगळे वळण लागले आहे. या घटनेशी संबंधित एक सिग्नल ज्युनिअर इंजिनिअर कुटुंबासह अचानक बेपत्ता झाला आहे.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे एक पथक 19 जून रोजी बालासोर येथील त्यांचे घर सील करण्यासाठी गेले होते. पण यावेळी ज्युनिअर इंजिनिअरसह त्याचे कुटुंबही घरी उपस्थित नव्हते. पण प्राथमिक माहितीनुसार सीबीआयने याआधी सिग्नल ज्युनिअर इंजिनिअरची प्राथमिक चौकशी केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 16 जूनला सीबीआयच्या टीमने बालासोरला भेट दिली. त्यानंतर सीबीआयची टीम पुन्हा एकदा १९ जूनला बालासोरला गेली होती. त्यावेळी सिग्नल ज्युनिअर इंजिनिअरचे सोरो येथील अन्नपूर्णा राईस मिलजवळील भाड्याचे घर सील करण्यात आले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या इंजिनिअरचे नाव आमिर खान असून, सीबीआयचे दोन कर्मचारी त्याच्या घरावर लक्ष ठेवून आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.