त्यामुळे ते दोन पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित!
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील डेक्कन जिमखाना भागातील प्रभात रस्त्यावर काम करणाऱ्या ठेकेदाराची अडवणूक करणाऱ्या डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी दिले.
पोलीस शिपाई निखिल राजेंद्र शेडगे, आकीब सत्तार शेख अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणे, तसेच बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी दोघांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आल्याचे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त गिल यांनी आदेशात म्हटले आहे.
गेल्या महिन्यात पोलीस कर्मचारी शेडगे, शेख रात्रपाळीत गस्त घालत होते. प्रभात रस्त्यावर मध्यरात्री एकच्या सुमारास ठेकेदाराकडून रस्त्याचे काम करण्यात येत होते. त्या वेळी पोलीस शिपाई शेडगे, शेख प्रभात रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये गेले. तेथील एका कामगाराचा मोबाइल संच घेतला आणि पोलीस नियंत्रणाला दूरध्वनी केला.
त्यानंतर पोलीस शिपाई शेडगे, शेख यांनी ठेकेदाराला अडवले. तुमच्याकडे मध्यरात्री काम करण्याची परवानगी, तसेच कार्यनिविदा आहे का? अशी विचारणा केली. रस्त्यात खडी पडली आहे. गाड्या घसरतील, असे दोघांनी ठेकेदाराला सांगितले. खडी बाजूला काढतो, असे ठेकेदाराने त्यांना सांगितले, तसेच कार्यनिविदा ही पोलीस कर्मचारी शेडगे आणि शेख यांना दाखविली. त्यानंतर ठेकेदाराला मध्यरात्री डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ठेकेदाराची अडवणूक केली.
या प्रकारानंतर ठेकेदाराने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या दूरध्वनीची चौकशी केली. तेव्हा दूरध्वनी एका हॉटेल कामगाराच्या नावावर असल्याचे आढळून आले. हॉटेल कामगाराची चौकशी केली. तेव्हा नियंत्रण कक्षाला मी दूरध्वनी केला नसून पोलीस शिपाई शेडगे आणि शेख यांनी माझा मोबाइल वापरुन पोलीस नियंत्रण कक्षात तक्रार दिल्याचे हॉटेल कामगाराने सांगितले. शेडगे आणि शेख यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत दोषी आढळून आल्यानंतर दोघांचे पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त गिल यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.