Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवारांनी हाती घेतले धनुष्य-बाण!

अजित पवारांनी हाती घेतले धनुष्य-बाण!बारामती : खरा पंचनामा

राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आज रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सकाळी ६ वाजता पहिल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर कन्हेरीत सुरु असलेल्या वन उद्यानाची पाहणी केली. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात नेहमीप्रमाणे अजित पवार यांच्या जनता दरबाराचं आयोजन केले होते. बारामतीमधील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली.

एन्व्हायरमेंट फॉर्म ऑफ इंडिया संस्थेचा कार्यक्रम होता. या संस्थेने आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमास अजित पवार यांनी हजेरी लावली. या ठिकाणी विविध खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी अजित पवार यांनी धनुष्यबाण हातात घेऊन अचूक निशाणा साधला. राजकीय क्षेत्रात नेहमी अचूक नेम धरणारे अजित पवार प्रत्यक्ष धनुष्यबाण हातात घेऊन अचूक निशाणा साधला. धनुष्यबाणमधील नेम हा त्यांचा लक्ष्यावर होता. त्यामुळे त्यांच्या एकाग्रतेचेही कौतूक उपस्थितांनी केले.

बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचा हॅप्पी स्ट्रीटस बारामती उपक्रमाचे उद्घाटन अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी हॅप्पी स्ट्रीटमध्ये विविध खेळांसह मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.