Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इस्लामपूरमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृण खून गॅंगमध्ये येत नसल्याने चार गुंडांचे कृत्य

इस्लामपूरमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृण खून
गॅंगमध्ये येत नसल्याने चार गुंडांचे कृत्यसांगली : खरा पंचनामा

आमच्या गॅंगमध्ये का येत नाहीस असे म्हणत इस्लामपूर येथे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. त्याच्या डोक्यात चोपरने वार करून तसेच दगड, विटांनी मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. मंगळवारी दहाच्या सुमारास नवीन बहे नाका येथील मल्हार बारसमोर ही घटना घडली. पोलिसांच्या रेकॉर्डवरील चार गुंडांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चौघांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रकाश महादेव पुजारी (रा. एमआयडीसी, इस्लामपूर, मूळ रा. सातबुलता, इंडी, जि. विजापूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गजराज पाटील, सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल, एक अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहन रविंद्र इच्छूर (वय १७, रा. एमआयडीसी, इस्लामपू, मूळ रा. सातबुलता, इंडी, जि. विजापूर) याने फिर्याद दिली आहे. 

मृत पुजारीसह सर्व संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संशयित गजराज पाटील याची गुन्हेगारांची टोळी आहे. त्याद्वारे तो गुन्हेगारी कारवाया करत असतो. मृत प्रकाश पुजारीही गुन्हेगार होता. प्रकाश हा गजराजच्या गॅंगमध्ये सामील होत नसल्याने त्याच्यासह त्याच्या टोळीला राग होता. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास नवीन बहे नाका येथील बारबाहेर प्रकाश थांबला होता. त्यावेळी संशयित त्याठिकाणी आले. त्यांनी त्याला आमच्या गॅंगमध्ये का सामील होत नाहीस म्हणत त्याच्यावर हल्ला केला. गजराजने चोपरने त्याच्या डोक्यावर वर्मी घाव घातले. त्यानंतर अन्य संशयितांनी लाथाबुक्यांनी, दगड, विटांनी त्याला मारहाण करून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.