महानिरीक्षक फुलारी यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल!
फलटण : खरा पंचनामा
फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी शनिवारी रात्री अकरा वाजता दारू पिऊन कार चालवत शहरातील दत्तनगर भागातील दोन युवकांना उडवले होते. मात्र, अपघातास करूनदेखील दादासाहेब पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. परंतु कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे दादासाहेब पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शनिवारी रात्री अकरा वाजता मुधोजी कॉलेज रोड, दत्तनगर, फलटण येथे फलटण ते सातारा रस्त्यावर पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी त्यांच्या ताब्यातील कारने (एमएच 12 एसक्यु 5359) भरधाव वेगात रस्त्यावरील दोन पादचाऱ्यांना उडवून जखमी केले होते.
या अपघातात पोलीस निरीक्षक पवार देखील जखमी झाले होते. त्यावेळी पवार यांनी मद्यपानही केले होते.
या अपघातानंतर जखमींना उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. अपघातानंतर पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांनाही पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेनंतर दोन दिवस उलटून गेले तरीही पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेऊन अपघातास कारणीभूत ठरलेल्या दादासाहेब पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर आज विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांच्या आदेशान्वये दादासाहेब पवार यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात मद्यपान करून गाडी चालविणे व दोन पादचाऱ्यांना गाडीने उडवून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.