शेतकऱ्याकडून 2 लाखांची लाच घेताना दैनिकाच्या संपादकाला अटक!
धाराशिव : खरा पंचनामा
पाझर तलाव आणि साठवण तलावसाठी संपादित केलेल्या जमीनाच्या मोबदल्याचे धनादेश काढून देण्यासाठी एका वृद्ध शेतकऱ्याकडून 2 लाखाची लाच घेताना धाराशिव जिल्ह्यातील एका दैनिकाच्या संपादकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
ही कारवाई शनिवारी धाराशिव (उस्मानाबाद) येथे केली आहे. दैनिक मराठवाडा योध्दा संपादक बाबासाहेब हरीशचंद्र अंधारे (वय 42 रा. गणपती मंदिर जवळ, आनंदनगर, उस्मानाबाद), खासगी इसम अनिरुद्ध अंबऋषि कावळे (वय 52 रा. केकस्थळवाडी, उस्मानाबाद) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत उस्मानाबाद जिल्ह्यातील 77 वर्षाच्या शेतकऱ्याने उस्मानाबाद एसीबीकडे तक्रार केली आहे.
तक्रारदार यांचे पत्नीच्या नावे असलेली शेत जमीन शासनाने पाझरतलाव व साठवण तलावासाठी संपादीत केलेली आहे. या जमिनीचा न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अधिकचा मोबदला प्रांत कार्यालय, उस्मानाबाद येथील अधिकाऱ्यांना सांगुन, तुमचे संपादित जमीनीचा मोबदला 26 लाख 56 हजार 017 रुपये व 4 लाख 31 हजार 798 रुपयांचे दोन धनादेश काढुन देण्याकरिता 2 लाख लाच रकमेची मागणी केली.
याबाबत वृद्ध शेतकऱ्याने उस्मानाबाद एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने शनिवारी पडताळणी केली असता अनिरुद्ध कावळे आणि बाबासाहेब अंधारे यांनी दोन लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.