Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पत्रकार दीपक चव्हाण यांचा नवी दिल्लीत कलाम युथ अवॉर्ड या आंतररष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

पत्रकार दीपक चव्हाण यांचा नवी दिल्लीत कलाम युथ अवॉर्ड या आंतररष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान सांगली : खरा पंचनामा

सांगली महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर आणि सांगलीचे स्वच्छ्तादुत शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार दीपक भीमराव चव्हाण यांचा नवी दिल्लीत आंतररष्ट्रीय पुरस्काराने सन्मान होणार आहे. दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय कलाम युथ लीडरशिप कॉन्फरन्ससाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दीपक चव्हाण यांची एकमेव या कॉन्फरन्स आणि युथ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 27 जुलै रोजी नवीदिल्लीत आंतरराष्ट्रीय युथ अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. 

दीपक चव्हाण हे गेल्या 20 वर्षापासून विविध क्षेत्रात काम करतात. वारांगना महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यापासून ते रस्त्यावरील बेघरासाठी त्यांनी निस्वार्थ काम केले आहे. आत्तापर्यंत दीपक चव्हाण यांनी पर्यावरण, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन, पाणी बचाव, बेटी बचाव अभियान, व्यसनमुक्ती अभियान, एडस् जनजागृती, मतदान जागृती, रस्ते सुरक्षा मोहीम, बेघरासमवेत दिवाळी पाडवा यासह अनेक क्षेत्रात काम केले आहे. 

1 मे 2018 पासून त्यांनी आपल्या शोले स्टाईल दुचाकीवरून तत्कालीन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम सुरू केली होती ती आजही सुरू आहे. कोरोना काळात त्यांनी आपल्या शोले गाडीवरून तब्बल 10 हजार किलोमीटरचा 555 दिवस प्रवास करीत 350 हुन अधिक गावामध्ये जाऊन  कोविडमध्ये घाबरलेल्या जनतेला दिलासा देण्याचे काम केले. याचबरोबर 40 कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी गाण्यांचे कार्यक्रम सादर करीत मनोरंजन केले. 

आझादीं का अमृत महोत्सव अंतर्गत दीपक चव्हाण यांनी पाच जिल्ह्यात 75 ठिकाणी स्व खर्चाने देशभक्तीपर गाण्यांचे कार्यक्रम सादर करीत देशभक्ती जागृत करण्याचे काम केले. या कामाची दखल घेत सांगली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यानी महापालिकेच्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी निवड करीत कार्याचा सन्मान केला. याचबरोबर एसटी महामंडळाने सुद्धा दीपक चव्हाण यांच्या स्वच्छता समितीवर शासकीय सदस्य म्हणून निवड करीत त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.