सांगलीत अट्टल घरफोड्यास अटक : 3 लाखांचा मुद्देमाल जप्त
एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील विश्रामबाग, कुपवाड येथे घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून रोकड, दागिने असा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
राकेश शिवलिंग हदीमनी (वय 24, रा. इंदिरानगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चोरी, घरफोडी असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी एक खास पथक तयार केले होते. पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश हदीमनी हा सांगलीत फिरत असल्याची माहिती खबऱयाद्वारे मिळाली.
पथकाने माहितीप्रमाणे शांतीबन चौकात सापळा रचला होता. राकेश तेथे येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने विश्रामबाग येथील 2 तर कुपवाड येथे एक घर फोडल्याची कबुली दिली. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने सापडले. त्याच्याकडून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, मच्छिंद्र बर्डे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, संजय कांबळे, शुभांगी मुळीक, सुनीता शेजाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.