तरुणाची आत्महत्या : सरपंच, उपसरपंच यांच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा
अट्रोसिटीची भीती घालून खंडणीची मागणी
विटा : खरा पंचनामा
खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह 6 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांनी तरुणाला अट्रोसिटी गुन्ह्यात अडकवण्याची तसेच 5 लाखांची खंडणी मागितल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंच अंकुश ठोंबरे, उपसरपंच सागर जाधव, धर्मराज जाधव, दादासो दुशारेकर, महेंद्र मोहिते, नितीन खुडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. महेश सुभाष जाधव (वय 25) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष सदाशिव जाधव (वय 58) यांनी फिर्याद दिली आहे.
सर्व संशयित मृत महेश याला अट्रोसिटी गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होते. तसे न करण्यासाठी 5 लाख रुपये दे असेही संशयित त्याला वारंवार म्हणत होते. शिवाय तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली होती. या धमक्यांना घाबरून महेशने शनिवारी दुपारी आत्महत्या केली. त्यानंतर रविवारी त्याच्या वडिलांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.