सरळ मार्गाने, कार्यक्षमपणे काम केल्यास पोच पावती मिळते : स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने
केंद्रीय जीएसटी अधिकारी राजेंद्र मेढेकर यांचा सत्कार
सांगली : खरा पंचनामा
जीवनात काय किंवा सरकारी कामात काय सरळ मार्गाने व कार्यक्षमपणे काम केल्यास पोच पावती मिळते असे प्रशांसौउद्गार ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने (आप्पा) यांनी काढले. ते केंद्रीय जीएसटी अधिकारी राजेंद्र मेढेकर यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.
सांगली येथे स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे वारसदार यांच्या वतीने राजेंद्र मेढेकर यांना केंद्रीय जीएसटी विभागातर्फे दीड लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर झाले. त्याबद्दल त्यांचा सत्कार स्नेहजित प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मती गौंडाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना मेढेकर यांनी जीएसटी विभागाने घोषीत केलेल्या पारितोषिकामुळे जबाबदारी वाढून अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते तसेच स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीयांनी केलेला सत्कार मी कृतज्ञतेने स्वीकारत आहे, असे सांगितले.
मेढेकर यांना केंद्र शासनाच्या महसूल वसुलीसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल रुपये दीड लाख इतके रोख पारितोषिक २०२२-२३ या वर्षासाठी प्रधान आयुक्त, केंद्रीय जीएसटी, कोल्हापूर यांनी पारितोषिक जाहीर केले आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महावीर कोथळे, धनपाल ऐनापुरे, आप्पासाहेब पाटील, विशाल व्होनमोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.