Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नोकरीच्या आमिषाने 8 जणांना 32 लाखांचा गंडा!

नोकरीच्या आमिषाने 8 जणांना 32 लाखांचा गंडा!



सांगली : खरा पंचनामा

शासनाच्या पोस्ट खात्यासह अन्य विविध विभागात नोकरी लावून देण्यासाठी सांगलीसह परिसरातील आठ जणांना तब्बल ३२ लाखांचा गंडा घालण्यात आला. भामट्याने पोस्ट खात्याचे बोगस नियुक्ती पत्रे डिजीटल शिक्का व बनावट स्वाक्षरी करुन संबंधितांना दिली आहेत. याची विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मालगाव येथील वैभव आण्णासो बंडगर (रा. मालगाव रोड, ता. मिरज ) याच्यावर  फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अतुल उर्फ सागर सुरेश ओमासे (रा. पंचशीलनगर, सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी ओमासे हे शहरातील एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करत आहेत. संशयीत वैभव बंडगर याचे कवलापूर येथे अक्षरदिप फाऊंडेशन ट्रस्ट तसेच अक्षरदिप शिक्षण संस्था आहे. यामाध्यमातून त्याने परिचयातील अनेकांना, माझ्या वरिष्ठ पातळीवर ओळखी असून काही लाख रुपये दिल्यास विविध शासकीय पदावर नोकरी लावण्याचे खात्रीशीररित्या सांगितले. 

त्याच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने आठ जणांनी संशयीत वैभव बंडगर यास वेळोवेळी ३२ लाख रुपये दिले. पोस्ट खात्यात लिपीक पदाकरिता फिर्यादी अतुल ओमासे यांच्याकडून ४ लाख, तलाठी पदासाठी राहुल ओमासे यांच्याकडून ७ लाख, पोस्ट खात्यातील लिपीक पदाकरिता अश्विनी ओमासे यांच्याकडून ३ लाख, अभिजीत खाडे यांच्याकडून लिपीक पदाकरिता ४ लाख, रेल्वे पोलीस पदाकरिता विशाल हुलवान यांच्याकडून २ लाख, सचिन डोंबाळे यांच्याकडून लिपीक पदाकरिता ५ लाख, अनिकेत सांगळे याला पोस्टामध्ये लिपीक पदासाठी ३ लाख आणि हणमंत गोविंद चंदनवाले यांच्याकडून लिपीक पदासाठी ४ लाख रुपये उकळले.

हा फसवणूकीचा सर्व प्रकार मार्च २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विश्रामबाग परिसरात घडला. संशय येवू नये याकरिता संशयीत वैभव बंडगरने, ज्यांनी पोस्ट विभागात नोकरीसाठी पैसे दिले होते त्यांना पोस्ट खात्याची बनावट नियुक्ती पत्रे दिली. त्याच्यावर डिजिटल शिक्का व बनावट स्वाक्षरी करण्यात आली होती. कालांतराने कोणत्याच आस्थापनेतून नोकरीकरिता बोलावणे न आल्याने यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संशयीत वैभव बंडगर याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी बंडगर याने स्वत: तसेच नातेवाईकांकरवी फिर्यादीसह अन्य सातजणांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे सर्वांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संशयीत वैभव बंडगर विरोधात फिर्याद दाखल केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.