Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राला केंद्रीय गृहमंत्री यांचा "बेस्ट पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन" पुरस्कार तत्कालीन प्राचार्य पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांचा सन्मान

खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राला केंद्रीय गृहमंत्री यांचा "बेस्ट पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन" पुरस्कार
तत्कालीन प्राचार्य पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांचा सन्मानमुंबई : खरा पंचनामा

राज्यातील अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठीचे भारतातील पश्चिम प्रादेशिक विभागासाठी (महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात राजस्थान हरियाणा आणि दिव दमन) सन 2020-21 या वर्षाचे "युनियन होम मिनिस्टर ट्रॉफी फॉर बेस्ट पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन" हा पुरस्कार     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त रितेश कुमार  यांच्यासह राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 


मुंबई येथील पोलीस मुख्यालयात खंडाळा प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन प्राचार्य व पुणे शहर पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी सन 2021- 22 मध्ये अभ्यासक्रमापासून ते पायाभूत सुविधा तसेच इतर अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये वसतिगृहातील सोयीसुविधांसह  स्मृति संग्रहालय, प्रेरणास्थळे, परिषद व परिसंवाद कक्ष, गांडूळ व कंपोस्ट खत प्रकल्प, महिला प्रशिक्षणार्थींसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, व्यायाम शाळा, अभ्यासिका,करमणूक कक्ष आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 

यापूर्वी खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राला  केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र, केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षण पदक, पोलीस महासंचालक यांचे आदर्श प्रशिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत. अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठीचे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणून खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या प्रामाणिक परिश्रमामुळे हा पुरस्कार मिळाला असल्याचे पोलीस उपयुक्त शशिकांत बोराटे यांनी यावेळी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.