Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चक्क मृत पोलीस अमलदाराला 'एसपी'समोर हजर राहण्याचे आदेश!

चक्क मृत पोलीस अमलदाराला 'एसपी'समोर हजर राहण्याचे आदेश!यवतमाळ : खरा पंचनामा

जिल्हा पोलिस दलाची आस्थापना सांभाळणाऱ्याचे दैनंदिन कामात प्रचंड दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वर्षभरापूर्वी मृत्यू झालेल्या अमलदाराला सतत गैरहजर असल्याने थेट आज्ञांकित कक्षात म्हणजेच 'एसपी'समोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

या अजब प्रकारामुळे मृत अमलदाराला आणायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बिनपगारी रजेवर असलेल्यांचा अहवाल तयार करण्यात आला. त्यातील अमलदाराना तात्काळ आज्ञांकित कक्षात म्हणजेच एसपीसमोर उपस्थित राहण्याची सूचना बिनतारी संदेशाद्वारे संबंधित ठाणेदाराना देण्यात आली. हा आदेश १७ जुलैला वायरलेसद्वारे प्रसारित करण्यात आला. यात एकूण १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यात दाराटी येथील शिपायाचा वर्षभरापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्याचेसुद्धा नाव या यादीत समाविष्ट केले आहे. बक्कल नंबर २३१७ असलेला हा शिपायी अमोल ठाकरे आहे. त्यांना १८ जुलैला सकाळी १० वाजता उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. यावरून थेट मुख्यालयातील माहिती अद्ययावत होत नसल्याचे दिसून येते. ही गंभीर चूक लक्षात आल्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.