Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राधानगरीतील राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी बंद!

राधानगरीतील राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी बंद!



कोल्हापूर : खरा पंचनामा

मुसळधार पावसामुळे राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने धबधबा पर्यटनासाठी आज गुरुवारपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला असून पर्यटकांनी धबधब्याकडे येण्यासाठी गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्याकडे शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठया प्रमाणात येत असतात. दोन, तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने पाण्याचा प्रवाह वाढला आहे. या प्रवाहातून लहान, मोठे दगड येत असल्याने तसेच पाणी प्रवाह अधिक असल्याने कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी राधानगरी तहसिल व पोलिसांनी गांभीर्य ओळखून अनिश्चित काळासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. धबधब्याकडे येणारे मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.