Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देव्हाऱ्यातील मूर्ती चोरणाऱ्या शिरोली येथील महिलेस अटक

देव्हाऱ्यातील मूर्ती चोरणाऱ्या शिरोली येथील महिलेस अटक



सांगली : खरा पंचनामा

घरात शिरुन देव्हाऱ्यातील चांदीच्या मुर्ती हातोहात लंपास करणाऱ्या वृध्द महिलेला सांगली पोलीसांनी सोमवारी अटक करुन ३१ हजार ५०० रुपयांच्या चांदीच्या मुर्त्या हस्तगत केल्या. याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची येथील महिलेला अटक करण्यात आली.

सुप्रभा मंडलीक (वय ७२ रा. पुराची शिरोली, ता. हातकणंगले) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. सांगलीतील सिव्हिलजवळ एक वृध्द महिला संशयास्पद आढळली. पोलीसांनी तिला ताब्यात घेऊन महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून झडती घेतली असता तिच्याकडे गणपती, लक्ष्मी, पिंड, शाळीग्राम याच्यासह ग्लास, वाटी या देवघरातील चांदीच्या वस्तू सापडल्या. 

या संशयित महिलेविरुध्द कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे निरीक्षक सतिश शिंदे यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.