Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हे कसलं त्रिशूळ, हे तर एक फुल दोन हाफ सरकार!

हे कसलं त्रिशूळ, हे तर एक फुल दोन हाफ सरकार!



यवतमाळ : खरा पंचनामा

आजपासून उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली आहे. पक्षाची पडझड झाल्यानंतर ठाकरेंनी पोहरादेवीपासून दौऱ्याला सुरुवात केली. आज त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. काल देवेंद्र फडवीसांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला.

काल गडचिरोली येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. काल बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आमच्यासोबत अजितदादाही फडणवीस म्हणाले होते की, आमच्यासोबत अजितदादाही आलेले आहेत. आता आमचा त्रिशुळ तयार झालाय. विकासाचा त्रिशुळ. तो शंकरासारखा भोळा आहे. परंतु जे लोकं महाराष्ट्रात जनसामान्यांच्या विरोधात काम करतील त्यांच्यासाठी तिसरा डोळा बनून त्यांना खाक करणारा त्रिशुळ तयार झाला आहे. असं विधान फडणवीसांनी केलं होतं.

त्याला आज उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्याचं सरकार हे एक फुल दोन हाफ, असं झालेलं आहे. यासरकारमध्ये दोन-दोन उपमुख्यमंत्री आहेत. आमचं सरकार होतं तेव्हा त्यांनी तीन चाकांचं सरकार आहे, अशी टीका केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.