'स्पा'च्या नावाखाली हॉटेलमध्ये बोलावून लुटणाऱ्यांना अटक!
मुंबई : खरा पंचनामा
'स्पा'च्या नावाखाली लोकांना हॉटेलमध्ये बोलावून बंदुकीच्या धाकावर लुटणाऱ्या टोळीला वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून एक देशी कट्टा, तीन काडतुसे, 9 मोबाईल आणि 10 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
निलेश शिवकुमार सरोज, विशाल राजेश सिंग, आदित्य उमाशंकर सरोज, सुरेश कुमार सरोज, कुलदीप शेषनाथ सिंग, सुरेश रामसिंग विश्वकर्मा, सपोन कुमार, अश्विनी कुमार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे लुटले आहे? किती पैसे लुटले? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
ही टोळी वाकोला परिसरात नवीन स्पा सुरू झाल्याचे सांगायची. मग ग्राहकांना फोन करून हॉटेलमध्ये बोलवायची. ग्राहक हॉटेलमध्ये आल्यावर आरोपी त्यांना बंदुकीच्या धाकावर लुटायचे. टोळीला मुंबईतील वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी पूर्वी ‘स्पा'शी संबंधित होते. त्यांच्याकडे जुन्या ग्राहकांचे नंबर होते. त्या नंबरच्या आधारे ते लोकांना कॉल करायचे आणि नंतर त्यांना हॉटेलच्या खोलीत बोलावून बंदुकीच्या धाकावर लुटायचे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.