तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर उद्या इस्लामपुरात : एका नेत्याची घेणार भेट!
इस्लामपूर : खरा पंचनामा
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर म्हणजेच के. चंद्रशेखर राव पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या बीआरएस पक्षाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केसीआर राज्यामध्ये पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे.
केसीआर उद्या मंगळवारी सकाळी दहा वाजता कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर ते वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे.
या कार्यक्रमानंतर ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.