जयपूर एक्सप्रेसमध्ये कॉन्स्टेबलचा अंधाधुंद गोळीबार : चौघांचा मृत्यू
मुंबई : खरा पंचनामा
जयपूर एक्स्प्रेसमध्ये पोलिसाकडूनच गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूर एक्स्प्रेसमध्ये पहाटे पाचच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका आरपीएफच्या जवानाचाही समावेश आहे. वापी आणि पालघर दरम्यान ही घटना घडली आहे. चेतन सिंह असं गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे.
घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. सध्या ही मुंबई सेंट्रल येथे थांबवण्यात आली आहे. तर हा गोळीबार एस्कॉर्ट ड्युटीवर असलेल्या आरपीएफच्या कॉन्स्टेबलने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरपीएफ जवानानेच सहकाऱ्यासह प्रवाशांवर गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने डब्यात बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. चेतन सिंह नावाचा आरपीएफचा कॉन्स्टेबल जो एस्कॉर्ट ड्युटीवर होता, त्याने एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टीका राम यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.