Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा!

भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा! अमरावती : खरा पंचनामा 

संत रामदास स्वामी म्हणायचे मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. पण आज भष्ट्र तितुका मेळवावा भाजपा पक्ष वाढवावा, असा भाजपचा एक अजेंडा झाला आहे. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे दोन दिवासांच्या विदर्भ दौऱ्यावर आहे. यावेळी अमरावती येथील सभेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले, या भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, पण त्यांना आत्मविश्वास नाही. आपण मोठे झालो, सत्ताधीश झालो तरीही आपण निवडून येऊ की नाही, याची धाकधूक त्यांना आहे. त्यामुळे समोर कुणाला ठेवायचंच नाही. विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर करायचा. पोलिसांमार्फत नोटीसा पाठवायच्या. अरे मर्दाची अवलाद असाल तर या यंत्रणा जरा बाजूला ठेवा आणि मैदानात या, असंही आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं. 

मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्यावरुन भाजपने रान उठवलं आहे. यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. जर कोविड काळातला मुंबई महापालिकेचा घोटाळा काढायचं असेल तर राज्यातील प्रत्येक महापालिकेचा कोविड काळातील घोटाळा काढायचा असेल तर राज्यातला आणि प्रत्येक महापालिकेतील घोटाळा शोधा. यासोबतच पीएम केअर फंडाचाही घोटाळा काढा, असं खुलं आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.