Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुन्हा लांबणीवर! सुनावणीसाठी पुन्हा पुढची तारीख

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुन्हा लांबणीवर!
सुनावणीसाठी पुन्हा पुढची तारीखनवी दिल्ली : खरा पंचनामा

राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षण आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या संदर्भात सुनावणी सुप्रीम कोर्टात अडकून पडली आहे. या सुनावणीला प्रत्येक वेळी कुठल्यातरी कारणाने पुढील तारीख दिली जाते. दरम्यान या प्रकरणावर आज पुन्हा सुनानणी होणार होती. मात्र पण राज्य सरकारचे वकील तुषार मेहता सुनावणीला हजर राहू शकले नाहीत अशी माहिती सुप्रीम कोर्टाचे वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे.

ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराजसंस्था संदर्भात सुप्रीम कोर्टाची ऐकण्याची मनस्थिती होती, पण राज्य सरकारचे वकील तुषार मेहता हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी वेळ मागितला आहे. आज सुनावणी होण्याची शक्यता कमी असून दुपारनंतर पुन्हा सुनावणी होते का हे पाहावे लागेल असे शिंदे म्हणाले.

दरम्यान राज्यातील ९२ नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार होती. पण महाराष्ट्र सरकारचे वकील तुषार मेहता हे आजच्या सुनावणीवेळी पोहचू न शकल्याने त्यांनी वेळ वाढवून मागीतली आहे. त्यामुळे आजही सुनावणी पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.