डीसीपी, एसीपी यांची तडकाफडकी बदली!
नाशिक : खरा पंचनामा
नाशिक शहरातील परिमंडळ दोनमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुन्ह्यात वाढ होत असल्याने नागरिकांसह राजकीय नेत्यांकडून ओरड होत आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांवर दबाव असून, पोलीस आयुक्तांनी प्रशासकीय कारण देत पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त यांची तडकाफडकी बदली केली आहे.
पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि सहायक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे यांची बदली केली आहे. तर उपायुक्तपदी मोनिका राऊत आणि सहायक पोलीस आयुक्तपदी आनंदा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत.
शहरातील अंबड, नाशिकरोड, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून वाहनांची तोडफोड, जळपोळ, मारामारी, घरफोडी, एटीएम सेंटरमध्ये चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडले आहे. गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यातील 12 पोलिसांसह गुन्हे शाखेतील दोन व अंबडमधील एका पोलिसाची दंगल नियंत्रण पथकाकडे बदली केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.