तासगावजवळ देशी बनावटीचे पिस्तुल (मेपटे) जप्त : एकाला अटक
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
तासगाव तालुक्यातील पाचवा मैल येथे देशी बनावटीचे पिस्तुल (मेपटे) घेऊन फिरणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून अग्निशस्त्र, दोन काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
स्वप्नील चंद्रकांत संकपाळ (वय 30, रा. निमणी, ता. तासगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी बेकायदा शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक श्री. शिंदे यांनी एक खास पथक तयार केले होते.
तासगाव येथील पाचवा मैल परिसरात एक तरुण कमरेला पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून तरुणाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ देशी बनावटीचे मेपटे तसेच दोन काडतुसे सापडली. त्याला अटक करण्यात आली आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उदय माळी, अमर नरळे, विक्रम खोत, संदीप गुरव, सागर लवटे, बिरोबा नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.