Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चेन स्नॅचिंग करणाऱ्यास जयसिंगुरमध्ये अटक : पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

चेन स्नॅचिंग करणाऱ्यास जयसिंगुरमध्ये अटक : पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्तजयसिंगपूर : खरा पंचनामा

देवदर्शनाहून परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून चोरून नेणाऱ्यास जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 2 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अब्बास उर्फ टायगर मुनीर ईराणी (वय 24 रा. गल्ली नं ०७ ईराणी मस्जिद, राजीवगांधीनगर, जयसिंगपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मंगळवारी फिर्यादी महिला जैन श्वेतांबर मंदीर गल्ली नं 3 येथून देव दर्शन घेवुन घरी परत जात असताना मोपेडवरून आलेल्या चोरटयाने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसडा मारून नेले होते. 

त्यानंतर चोरटा स्टेशनचे रोडचे दिशेला निघून गेला. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहीतीच्या आधारे अब्बास उर्फ टायगर ईराणी याने हा गुन्हा केल्याचे निष्पन झाले. तो राजीवगांधीनगर जयसिंगपूर येथील ईराणी मस्जिद याठिकाणी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने केलेले 2 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. त्याच्याकडून पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महापुरे, पोलिस नाईक भोसले,  रोहित डावाळे, श्री. सूर्यवंशी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.