Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रवींद्र शेळके यांची हडपसर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती!

रवींद्र शेळके यांची हडपसर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती!



पुणे : खरा पंचनामा

पुणे शहर पोलिस दलातील हडपसर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रविंद्र धैर्यशील शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत. पुणे शहर पोलिस दलातील पोलिस आस्थपना मंडळाची बैठक शनिवारी झाली. त्यामध्ये रविंद्र शेळके यांना हडपसर पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

श्री. शेळके 2010 मध्ये पोलिस निरीक्षक झाले. त्यांनी यापूर्वी गोंदिया, सोलापूर जिल्ह्यात निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्यांनी सांगली जिल्ह्यात 4 वर्षे निरीक्षक म्हणून विविध पोलिस ठाण्यात कार्यभार पाहिला आहे. विटा सारख्या संवेदनशील पोलिस ठाण्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी दीड वर्ष काम केले. गेल्या मार्चमध्ये त्यांची बदली पुणे येथे झाली. आता त्यांची पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.