Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य उत्पादन शुल्कच्या बदल्यांमध्ये गोंधळात गोंधळ! सांगलीचा विटा विभाग चर्चेत

राज्य उत्पादन शुल्कच्या बदल्यांमध्ये गोंधळात गोंधळ!
सांगलीचा विटा विभाग चर्चेतसांगली : खरा पंचनामा

राज्य शासनाने नियमित वार्षिक बदल्यांसाठी 30 जून अखेर मुदतवाढ दिली होती. त्यानंतरही विविध कारणास्तव अनेक बदल्या करण्यात येत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागातील या बदल्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. नियमित बदली होऊनही केवळ माझा माणूस हवा म्हणून अनेक बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातही सांगलीतील विटा विभाग अधिक चर्चेत आहे. कदाचित या बदल्याना मेट कोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाने मुदतवाढ देण्याआधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नेहमीप्रमाणे बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आतापर्यंत फारसा बदल करण्यात आला नाही. मात्र सरकारमध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री झाल्यानंतर अनेक गणिते बदलली आहेत. शिंदे गटाकडे सध्या हे खाते आहे. नियमित बदल्या झाल्यानंतरही अजुन बदल्यांचे सत्र सुरू आहे.

नियमित बदल्यांमध्ये सांगलीतील एका अधिकाऱ्याची विटा विभागात बदली झाली. त्याचवेळी एका महिला अधिकाऱ्याची इस्लामपूर येथे बदली झाली. दोघेही बदलीच्या ठिकाणी हजर झाले. मात्र त्या मॅडम नाखूष होत्या. मग त्यांनी विट्याच्या सरकारमधील साहेबांकडे फिल्डिंग लावली. साहेबांनी ते मनावर घेत त्या मॅडमची विटा विभागात बदली करवून घेतली.

पण पूर्वीच या विभागात बदली झालेल्या अधिकाऱ्याला इस्लामपूर येथे पाठवण्यात आले. त्या अधीकाऱ्यावर अन्याय करण्यात आला अशी चर्चा आहे. दरम्यान अशा अनेक बदल्या नियमबाह्यपणे करण्यात आल्याने बरेच अधिकारी मेट कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.