Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमृता फडणवीस यांच्या ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट : सीएवर गुन्हा

अमृता फडणवीस यांच्या ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट : सीएवर गुन्हा



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका ट्विटवर आक्षेपार्ह पोस्ट करणे एका सीएला चांगलेच महागात पडले. सायबर पोलिस ठाण्यात या सीएविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवर टाकलेल्या फोटोला आतीष ओमप्रकाश काबरा (वय ३५,रा.नरहरी वसंत विहार, एसबीएच कॉलनी, ज्योतीनगर ) याने टॅग करून फोटोवर  आक्षेपार्ह कमेंट केली होती. हा प्रकार भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अतीष काबरा याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव करीत आहेत. 

अमृता फडणवीस सोशल मिडियावर कायम सक्रीय असतात. अनेक विषयांवर त्या आपली मते मांडतात, त्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलही केले जाते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत त्या आपल्या भूमिका समाज माध्यमांवर ठेवत असतात. अशाच एका ट्विटरवरील त्यांच्या पोस्टवर छत्रपती संभाजीनगर येथील सीए असलेल्या व्यक्तीने अश्लील आणि आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली. हा प्रकार समजताच भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत आतिष काबरा याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.