Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ड्युटीवर लेट, निवृत्ती कार्यक्रमात वेळेत : महिला अधिकाऱ्याने तिच्या कानाखाली काढला जाळ!

ड्युटीवर लेट, निवृत्ती कार्यक्रमात वेळेत : महिला अधिकाऱ्याने तिच्या कानाखाली काढला जाळ!कोल्हापूर : खरा पंचनामा

ड्युटीवर येताना कायमच लेट येणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याचा निरोप समारंभ नुकताच झाला. ड्यूटीवर लेट आल्याने त्रास दिलेल्या त्या निवृत्त महिलेच्या कानाखाली पीडित महिलेने कानाखाली जाळ काढला. 

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या कानशिलात कार्यक्रमाची बदलीपेक्षा जास्त चर्चा रंगली आहे.

बदलीचा कार्यक्रम राहिला बाजूला, दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये कानाखाली जाळ काढण्याच्या कार्यकमाने कर्मचारी मात्र भेदरून गेले. अखेर कर्मचाऱ्यांनीच वाद थांबवल्यानंतर तसेच वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले नाही. मात्र, कानशिलातचा कार्यक्रम याची देही याची डोळा पाहिलेल्या कर्मचाऱ्यांनी याला दुजोरा दिला. दरम्यान, कानाखाली बदलीच्या कार्यक्रमाचा पार पचका करून टाकणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने नंतर माफी मागून वादावर पडदा पाडल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित दोन वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांमधील एक वैद्यकीय अधिकारी आपल्या चार वर्षांच्या सेवाकाळात कधीच कार्यालयात वेळेत हजर झाल्या नाहीत. प्रमुख असलेल्या महिला अधिकाऱ्यांकडे गगनबावडा तालुक्यातील आरोग्य केंद्राचा अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे वर्ग दोन असलेल्या महिला अधिकाऱ्यावर कामाचा ताण चांगलाच पडला होता. दोन्ही महिला अधिकाऱ्यांची चार वर्षांनी भेट झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून दोन्ही महिला अधिकाऱ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये पहिल्यांदा कामाचा अतिरिक्त ताण पडलेल्या वर्ग दोनमधील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पाच दिवसांपूर्वी कार्यक्रम आयोजित करण्यात आला, तर शुक्रवारी प्रमुख अधिकारी असलेल्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्यासाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

निरोप समारंभाच्या कार्यक्रमाची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त कामाचा ताण सहन केलेल्या आणि निरोप समारंभाचा कार्यक्रम होऊन वर्ग दोनमधील महिला वैद्यकीय अधिकारी सुद्धा हजर झाल्या. यावेळी दोघींमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. वाद वाढल्यानंतर थेट कानशिलात देण्यात आली. राग थंड झाल्यानंतर कानशिलात वाजवणाऱ्या महिलेने माफी मागितल्याने वादावर पडदा पडला. तसेच वरिष्ठांनी सुद्धा हस्तक्षेप केल्याने प्रकरण पोलिसापर्यंत गेले नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.