Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमधून चार नावांची चर्चा!

विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमधून चार नावांची चर्चा!मुंबई : खरा पंचनामा

विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंड केलं, राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी झाल्यानं काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात आला आहे. संधी कोणाला मिळाणार? काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्यानंतर काँग्रेसमधून कोणाला संधी मिळणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

यातच आता सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि संग्राम थोपटे या काँग्रेस नेत्यांच्या नावाची विरोधीपक्ष नेतेपदासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.