Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार समर्थक आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला!

अजित पवार समर्थक आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला!मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादीतील फुटीनंतर वातावरण तापले असतांनाच आज अजित पवार यांनी आपल्या सर्व मंत्री, आमदार सहकाऱ्यांसह शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर आज पुन्हा ते पवारांच्या भेटीला गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोबत्यांसह यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गेले आहेत.

त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच मोठे नेते शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.