Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुख्यमंत्र्यांच्या यॉर्करवर जयंत पाटील यांचा षटकार!

मुख्यमंत्र्यांच्या यॉर्करवर जयंत पाटील यांचा षटकार! 

मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्याचे पडसाद आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार सत्ताधारी बाकांवर बसले तर राष्ट्रवादीचे आमदार विरोधी बाकांवर बसले. त्यामुळं आता राष्ट्रवादीतील फूट विधीमंडळातही पडल्याचं दिसून आलं. 

आजचं कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्र्यांचा परिचय करून देताना चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करून देण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नव्या मंत्र्यांची माहिती देण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी पहिलंच नाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं घेतलं. त्यात त्यांनी अजित पवारांचा उल्लेख उपमुख्यमंत्री व वित्त असा केला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहाला नमस्कार करत असतानाच विरोधी बाकांवर बसलेले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी 'त्यांची आमची जुनी ओळख आहे', असं म्हणत शिंदे- फडणवीसांना जोरदार टोला हाणला. त्यावेळी अजित पवार यांच्यासहित विरोधक आणि सत्ताधारी आमदारांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.