Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साताऱ्यात अपघात; जयसिंगपुरातील 3 ठार, 4 जण गंभीर जखमी

साताऱ्यात अपघात; जयसिंगपुरातील 3 ठार, 4 जण गंभीर जखमी



सातारा : खरा पंचनामा

सातारा बॉम्बे रेस्टॉरंटनजीक  दोन चारचाकी गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व मयत आणि जखमी जयसिंगपूर येथील असून आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

निखिल शशिकांत सव्वाखंडे, प्रियांका निखिल सव्वाखंडे, शशिकांत यदुनाथ सव्वाखंडे अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. महामार्गावर प्रवासी घेण्यासाठी महेंद्रा पिकअप थांबली होती. यावेळी पाठीमागून आलेल्या तवेरा गाडीचा टायर फुटून तवेरा गाडी थांबलेल्या पिकअपवर जाऊन आदळली.

यामध्ये 3 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून बाजूला हटवण्यात आले आहे.

तर, जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर पिकअप गाडीचा चालक फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या घटनेची नोंद शहर पोलिसांत करण्याचं काम सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.