Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अडीच वर्षांचा मुलगा बंदुकीच्या गोळीने जखमी! बँक कर्मचाऱ्याच्या घरातील घटना

अडीच वर्षांचा मुलगा बंदुकीच्या गोळीने जखमी!
बँक कर्मचाऱ्याच्या घरातील घटना



छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

बँकेत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या घरात बंदुकीची गोळी लागून त्याचा अडीच वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गावठी कट्ट्यातून ही गोळी सुटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र बँक कर्मचाऱ्याकडे गावठी कट्टा कुठून आला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे. आर्यन राहुल राठोड असे जखमी अडीच वर्षीय मुलाचे नाव आहे. मुलाच्या कपाळाच्या मध्यभागी गोळी लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत

बीड जिल्ह्यातील राहुल कल्याण राठोड आणि संगीता राठोड असे पती-पत्नी मुलासह अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये भाड्याने राहतात. राहुल हा शहरातील खाजगी कर्ज वितरण करणाऱ्या बँकेत कामाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या घरातून अचानक जोराचा आवाज झाला. त्यानंतर राहुल आणि त्याची पत्नी जखमी मुलाला घेऊन रुग्णालयाकडे धावत निघाले होते.

यावेळी आई मुलाला गोळी लागली असं म्हणून जोरजोरात रडत होती. त्यामुळे परिसरातील महिला आणि नागरिक घराबाहेर आल्या आणि याबाबत त्यांनी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तपास सुरु केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.