Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

30 हजारांची लाच घेताना पीएसआयला अटक!

30 हजारांची लाच घेताना पीएसआयला अटक!



जालना : खरा पंचनामा

तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेताना जालना जिल्हयातील अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. योगेश हरी चव्हाण  (वय 39) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत तक्रारदार यांनी छत्रपती संभाजीनगर एसीबी कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी संतोष हरणे यांच्याशी गट क्रमांक 718 क्षेत्रातील 5 एकर 29 गुंठ्याचा व्यवहार केला आहे. मात्र, यामध्ये वाद झाल्याने संतोष हरणे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला आहे. तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये तक्रारदार यांच्या बाजूने मदत करुन देण्यासाठी पीएसआय योगेश चव्हाण यांनी सुरुवातीला तक्रारदार यांच्या मित्राच्या मदतीने दहा हजार रुपये लाच घेतली. त्यानंतर योगेश चव्हाण यांनी आणखी 40 हजार रुपयांची मागणी केली. 

त्यानंतर तक्रारदार यांनी छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पीएसआय योगेश चव्हाण यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.