Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

धामणी परिसरात पट्टेरी तरसाचे दर्शन! वनविभागाकडून शोध मोहिम

धामणी परिसरात पट्टेरी तरसाचे दर्शन!
वनविभागाकडून शोध मोहिम



सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील धामणी परिसरात एका हॉस्पिटलजवळ काल रात्री पट्टेरी तरस काही नागरीकांना दिसला. त्यानंतर तातडीने वनविभागास कळवण्यात आले. वनविभागाचे पथक तातडीने दाखल झाले. त्यावेळी तो पट्टेरी तरस असल्याची खात्री झाली. रात्रभर त्याचा माग काढण्यात आला. तो शामरावनगर परिसरात दिसून आला. त्यानंतर रात्री उशीरा तो हरिपूरच्या दिशेने गेल्याचे पायाच्या ठस्यावरून दिसून आले. आज पुन्हा शोध मोहिम राबवण्यात आली.

त्यानंतर शहरासह परिसरात आज ध्वनीक्षेपकावरून वनविभागाकडून आवाहन करण्यात आले. तरसापासून कोणताही धोका नाही, असे सांगण्यात आले आहे. तरस कोणाला दिसून आल्यास वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील, मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील यांच्यासह पथक तरसाच्या शोध मोहिमेवर आहे. 

धामणी परिसरातील एका हॉस्पिटलजवळ रात्री आठच्या सुमारास तरस असल्याचे एका नागरीकाने पाहिले. त्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली असता तो तरस असल्याचे खात्री झाली. रात्री उशीरापर्यंत शोध मोहिम सुरू होती. शामरावनगरसह कोल्हापूर रस्ता परिसरातून तो पश्‍चिम बाजूला अर्थात हरिपूरच्या दिशेने गेल्याचे दिसून आले.

माणसासारखा हसतो
तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे. या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला ‘लाफिंग ॲनिमल’ असेही म्हणतात. तरस मांसभक्षक असतो. पट्टेरी तरस भारत, नेपाळ, पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देश व उत्तर आफ्रिका, केन्या, टांझानिया, अरबी द्वीपकल्पात आढळतात. भारतात उत्तर भारत, मध्यप्रदेशात तरस सापडतात. भारतात सध्या सुमारे हजार ते तीन हजार तरस असल्याची आकडेवारी आहे. मजबूत जबडा, इतर शिकारी प्राण्यांनी केलेल्या शिकारीवर गुजराण करतो म्हणजे थोडक्यात गिधाड या पक्षासारखे सफाईचे काम करतो. पट्टेरी तरस असे त्याचे नाव आहे. याचे शास्त्रीय नाव हायना हायना असे आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.