Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सचिन तेंडुलकरला आ. बच्चू कडू पाठवणार नोटीस!

सचिन तेंडुलकरला आ. बच्चू कडू पाठवणार नोटीस!



मुंबई : खरा पंचनामा

ऑनलाइन गेमच्या जाहिरातीमधून युवा वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. ऑनलाइन गेमच्या जाहिराती बंद केल्या पाहिजेत, यासाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू हे मागील काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. दरम्यान, ऑनलाइन गेमच्या जाहिराती बंदी घालावी अशी मागणी कडू यांनी केली होती. यानंतर त्यांनी ऑनलाइन गेमच्या जाहिराती भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी करु नये, कारण यातून अनेक तरुण वर्ग याकडे वळला जात असून, त्यांचे नुकसान होत असल्याचं कडूंनी म्हणत ह्या ऑनलाइन गेमच्या जाहिराती सचिनने करु नये, असं कडूंनी म्हटलं होतं.

दरम्यान, ऑनलाइन गेमच्या जाहिरातीवरुन कडू आक्रमक झाले असून, सचिनला सांगूनही सचिनने ऐकले नाही, म्हणून बच्चू कडू सचिन तेंडुलकर यांना वकिलांमार्फत नोटीस बजावणार आहे. 30 ऑगस्ट रोजी बच्चू कडू ही नोटीस तेंडुलकर यांना पाठवणार आहेत. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचं कडूंनी म्हटलं होतं. यानंतर ते आता सचिनला नोटीस पाठवणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.