Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील तत्कालीन एपीआय सुरज चंदनशिवे खून प्रकरणी दोघांना अटक! आर्थिक वादातून खून झाल्याचे स्पष्ट : पोलिस निरीक्षक कुलकर्णी

सांगलीतील तत्कालीन एपीआय सुरज चंदनशिवे खून प्रकरणी दोघांना अटक! 
आर्थिक वादातून खून झाल्याचे स्पष्ट : पोलिस निरीक्षक कुलकर्णीसांगोला : खरा पंचनामा 

सांगलीतील तत्कालीन बडतर्फ एपीआय सुरज विष्णू चंदनशिवे यांचा निर्घृणपणे खून केला होता. हा खुन आर्थिक वादातून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निप्पन्न झाले. त्यानंतर वासुद येथील दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सुनील मधुकर केदार, विजय बबन केदार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयने गुरुवार दि. २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बुधवार दि. 2 ऑगस्टच्या रात्री साडेनऊ ते गुरुवार दि. ३ ऑगस्टच्या पहाटे साडेचार वाजण्याच्या पूर्वी सुरज विष्णू चंदनशिवे (वय ४३, रा. वासुद, ता. सांगोला) हे घरातून जेवण करून फिरण्यासाठी गेले होते ते रात्री उशिरापर्यंत परत आले नाहीत. पहाटे साडेचारच्या सुमारास केदारवाडी रोडवर सुरज चंदनशिवे यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते.

चंदनशिवे याला अज्ञाताने धारदार हत्याराने डोक्यात व पाठीवर मागील बाजूस वार करून गंभीर दुखापत करून त्याचा खून करून त्याचे पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने उसाच्या शेतात टाकले होते. या खुनाचा गुन्हा दि. ३ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. 

घटनास्थळी पोलीस अधीक्षक गिरीश सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी भेट दिली होती. या खुनाच्या तपासासाठी वेगवेगळ्या चार टीम बनवण्यात आल्या होत्या. सखोल तपास केल्यानंतर सुनील केदार व विजय केदार यांना दि. ३ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते. तसेच गावातील इतरांना विचारपूस करून गोपनीय बातमीदार मार्फत तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. 

यामध्ये चंदनशिवे यांचे गावातील सुरज मधुकर केदार यांच्याबरोबर आर्थिक हितसंबंध व अन्य वादविवाद असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांमध्ये असलेल्या आर्थिक वादातून त्यांच्यात वर्षभरापासून तीव्र वाद सुरू होता. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली. सुनील मधुकर केदार व विजय बबन केदार या दोघांचा या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांना शुक्रवार दि. १८ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. 

दोघा संशयितांना पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर त्यांना उभे केले असता न्यायालयाने गुरुवार दि. २४ ऑगस्टपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली .

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.